जत प्रांताधिकारी कार्यालयातील लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात | नुकसान भरपाई फाईलसाठी 20,000 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

0



जत,प्रतिनिधी : जत प्रांताधिकारी कार्यालयातील लुबाडणूकीचा अखेर पदार्पाश झाला आहे.प्रांताधिकारी कार्यालयातील लिपीक श्रीकांत कृष्णा चंदनशिवे (वय 46 वर्ष अव्वल कारकून, उप विभागीय अधिकारी उपविभाग जत कार्यालय वर्ग.-3 रा. आंबेडकर नगर, कवठेमहंकाळ ता.कवठेमहंकाळ)अखेर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.वाषाण येथील एका शासकीस नुकसान भरपाई फाईल मंजूर करण्यासाठी या लिपीकाने 20,000/-रूपयाची लाच स्विकारल्यानंतर रंगेहाथ पकडले आहे.







श्री. श्रीकांत कृष्णा चंदनशिवे वय ४६ वर्ष अव्वल कारकून, उप विभागीय अधिकारी उपविभाग

जत कार्यालय वर्ग.- ३ रा. आंबेडकर नगर, कवठेमहंकाळ ता.कवठेमहंकाळ जि.सांगली यानां २०,०००/- रुपये लाच स्विकारले नंतर रंगेहात पकडले.तक्रारदार यांची बागेवाडी पो. वशान ता. जत जि. सांगली येथील जिरायत शेत जमीन म्हैसाळ उपसा सिंचन योजने अंतर्गत जत कालवा या शासकीय कामामध्ये गेलेली आहे. सदर शेतजमीनीची शासकीय नुकसान भरपाईची फाईल मंजूर करून देणे करिता श्री. चंदनशिवे, अव्वल कारकून प्रांत कार्यालय जत

यांनी २५०००/- रूपये लाच मागणी केली.






Rate Card

असल्याबाबत तक्रारदार यांनी आज दि ३१.०८.२०२० रोजी तक्रार दिली होती.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दिनांक ३१.०८.२०२० रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये श्री. चंदनशिवे, अव्वल कारकून यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम २५०००/- रूपये लाचेची मागणी करून चर्चे अंती २०,०००/- रूपये लाचेची मागणी

करून लाच रक्कम घेवून येण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले.त्यानंतर लागलीच उप विभागीय अधिकारी उपविभाग जत कार्यालय या ठिकाणी सापळा लावला असता श्री. श्रीकांत कृष्णा चंदनशिवे वय ४६ वर्ष अव्वल कारकून, उप विभागीय अधिकारी उपविभाग जत कार्यालय वर्ग.- ३ यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून २०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.




त्याअनुषंगाने श्री. श्रीकांत कृष्णा चंदनशिवे वय ४६ वर्ष अव्वल कारकून, उप विभागीय अधिकारी उपविभाग जत कार्यालय वर्ग.- ३ यांचे विरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.सदरची कारवाई मा. श्री. राजेश बनसोडे सो पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक, व श्रीमती सुषमा चव्हाण सो अपर पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक,श्री. गुरूदत्त मोरे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी अविनाश सागर, सुहेल मुल्ला, संजय संकपाळ, सलिम मकानदार, धनंजय खाडे,सिमा माने, वीणा जाधव, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.



नागरिकांना आवाहन करण्यात येते की, लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास पोलीस उप अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बदाम चौक, सांगली. येथे अथवा कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५ वर तसेच हेल्प लाईन क्रमांक १०६४ वर तसेच व्हॉट्स अॅप नंबर ७८७५३३३३३३ व मोबाईल नंबर ८९७५६५१२६२ तसेच खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा.

संपर्क

१) मोबाईल अँप – www.acbmaharashtra.net

२) फेसबुक पेज – www.facebook.com-maharashtraACB

३) वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in

Scanned by CamScanner

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.