जतेत कोरोनाबाधितासाठी 75 बेडची सुविधा ; जिल्हाधिकारी

0जत,प्रतिनिधी : कोरोनाची लक्षणे अंगावर न काढता त्रास जाणवताच उपचारासाठी कोविड सेंटर,रुग्णालयात दाखल व्हावे,कोणताही आजार अंगावर काढू नका,अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जत येथील पत्रकार बैठकीत दिली.यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,प्रांताधिकारी प्रंशात आवटे,तहसीलदार सचिन पाटील,मुख्याधिकारी मनोज देसाई,पो.नि.उत्तम जाधव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर, आदी अधिकारी उपस्थित होते.

डॉ.चौधरी म्हणाले,कोरोना उपचारासाठी सरकार अनेक उपाययोजना करीत आहे.त्या अनुषंगाने जत तालुक्यात शासकीय कोविड सेंटर बरोबर दोन खासगी रूग्णालयेही उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत.दोन्ही हॉस्पिटल मध्ये 75 बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील संसर्ग अँनलॉक शिथील झाल्याने ग्रामीण भागात पोहचला आहे.पुढील महिना महत्वाचा आहे.नागरिकांनी आम्ही दिलेले सर्व नियम पाळावेत.

Rate Cardकोरोनासदृष्य लक्षणे दिसताच कोविड रुग्णालयात उपचार घ्यावा.हा आजार कोणीही अंगावर काढू नये.शासन सर्वप्रकारे खबरदारी घेत आहे. जतमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी येत्या 2 दिवसात जतमधील दोन खाजगी हॉस्पिटल मधून शासनाने ठरवून दिलेल्या फी प्रमाणे बिल आकारून उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत.तालुक्यातील शासकीय रुग्णालये,कोविड सेंटर,प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुचना केल्या आहेत.त्यामुळे कुठेही कोरोना बाधिताची हेळसाड होणार नाही,असेही डॉ.चौधरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.