जतेत पुन्हा 17 कोरोना पॉझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुन्हा 17 पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली.तालुक्याची बाधित संख्या 356 वर पोहचली आहे.जत शहरातील कोरोना बाधित संख्या पुन्हा रवीवारी वाढली.सोमवारी शहरात तब्बल 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर वळसंग 1,बेवणूर 2,बिळूर 1,जाडरबोबलाद 1,ककमरी (कर्नाटक)1रुग्ण आढळले आहेत.

जत शहरात रँपीड टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत.शहरातील वाढणारी संख्या चिंतेचा विषय बनली आहे.रवीवारी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जतचा दौरा केला.जत शहरातील कोविड सेंटर,ग्रामीण रुग्णालय,डॉ.रविंद्र आरळी व डॉ.शालीवाहन पट्टनशेट्टी यांच्या हॉस्पिटलची पाहणी केली.या दोन्ही खाजगी रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.दरम्यान जिल्हाधिकारी आज जतेत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क दिसली.पोलीसांनीही शहरात फेरफटका मारला.
