भांडणे सोडविणाऱ्यांवर चाकूने हल्ला | जतमधील घटना
जत,प्रतिनिधी : दोघात लागलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणांवर दोघांने चाकू हल्ला करत जखमी केल्याची घटना जत शहरातील स्वामी गल्लीतील कन्या शाळेजवळ दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
दत्तात्रय शेकाप्पा कोळी,वय-31रा.जत असे जखमीचे नाव आहे.याप्रकरणी संतोष गुरूदत्त कोळी (वय- 28)राकेश विठ्ठल कोळी (वय-29,रा.दोघे रा.कोळी गल्ली जत)या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जत शहरातील स्वामी गल्लीतील कन्याशाळेजवळ संतोष कोळी व राकेश कोळी यांच्यात वादावादी सुरू होती.ते बघून तेथून जाणाऱ्या दत्तात्रय कोळी यांनी दोघाचे भांडण सोडविण्याचे प्रयत्न केला,असता दोघांनी मिळून दत्तात्रय कोळी यांच्यावर चाकूने हल्ला केला.त्यात त्यांना तोंडावर गंभीर जखमा झाल्या.हल्यानंतर संशयितांने तेथून पळ काढला.दरम्यान जखमी दत्तात्रय कोळी यांनी जत पोलीस गाठत फिर्याद दिली.पोलीसांनी तातडीने घटनास्थळी पोहचत हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास हवलदार सदाशिव कणसे करत आहेत.
