जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात अनेक दिवसापासून ठिय्या मांडलेले महसूल व कृषी विभागातील मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.
जत महसूलमधील अनके मंडल अधिकारी मुदती संपूनही कमाईच्या ठाण्यावर विराजमान आहेत.त्यांची शासन नियमाचे दिवस संपूनही बदली होत नसल्याने ते मुर्दाड झाले आहेत.त्यातील अनेकाकंडून नोंदीसह महसूलच्या कामासाठी नागरिकांची दिवसाढवळ्या लुट केली जात आहे.अनेकांचे वाळू तस्करांशी संधान असल्याचे आरोप आहेत.एका मंडळ अधिकाऱ्यांवर नोंदीच्या नावावर लुट करत असल्याचे व थेट वाळू तस्कारीत सहभाग असल्याचे आरोप झाले आहेत.
त्यांची खातेनिहान समिती नेमून तपासणीही करण्यात आली आहे. त्यांचा अहवालही प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल झाल्याचे समजते आहे.असे गंभीर आरोप असूनही ठिय्या मांडलेल्या या महसूलच्या मंडळ अधिकाऱ्यांना खांदेपालट करण्यात प्रांताधिकारी लक्ष घालणार का असा सवाल उपस्थित होत आहे.त्याचबरोबर कृषीचे ठिय्या मांडलेले मंडळ अधिकाऱ्यांना भूमीपुत्र असलेल्या एका अधिकाऱ्यांचा वरहस्त असल्याचे बोलले जात आहे.आतातरी भूमीपुत्राचा वरिष्ठ अधिकारीही मर्जीतील आल्याने कृषीचा सावळा गोधळ वाढणार असल्याचे निश्चित आहे.
यापुढे शेतकऱ्यांना नाडविणाऱ्याचे प्रकार घडल्यास वावगे वाटणार नाही.या मुर्दाड अधिकाऱ्यांना हलविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.





