जतच्या दोन खाजगी रुग्णालयामध्ये कोविड सेंटर | 75 बेड उपलब्ध ; अत्याधुनिक उपचार, ऑक्सीजनची सोय
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात वाढत असलेली कोरोना बाधित संख्येच्या पार्श्वभूमीवर जत शहरातील दोन खाजगी दवाखाने प्रशासनाने कोविड सेंटरसाठी ताब्यात घेतले आहेत.दोन्ही हॉस्पिटल मध्ये ऑक्सीजन, 75 बेडची सोय करण्यात आली आहे.

जत तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहेत.सध्या ही संख्या 339 वर पोहचली आहे.जिल्ह्यात सर्वत्र बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.त्यामुळे मिरज,सांगलीतीलही कोविड रुग्णालये हाऊसफुल झाली आहेत.त्यामुळे जत तालुक्यातून जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
त्या पार्श्वभूमीवर जत शहरातील डॉ.रविंद्र आरळी यांचे कै.शांताबाई मल्टस्पेशालिटी हॉस्पिटल व डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी यांचे मयुरेश हॉस्पिटल शासनाने ताब्यात घेत येथे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.येथे अत्याधुनिक उपचार, ऑक्सीजन सह 75 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र येथे उपचार कसे मिळणार याबाबत स्पष्टता नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.दरम्यान आज जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत चौधरी या दोन्ही कोविड रुग्णालयांना भेट देऊन पाहणी करण्याची शक्यता आहे.
