संख प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करा ; शिवसेना
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील एका गावातील वयोवृद्ध महिलेवर केलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करावी व पीडित महिलेला योग्य न्याय मिळावा, अशी मागणी जत तालुका शिवसेना व युवा सेना संघटनांतर्फेकरण्यात आली आहे. याबाबत जत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गील, प्रांताधिकारी प्रशांत आवटी यांना निवेदन दिले आहे.

तालुक्यातील एका गावील 65 वर्षीय वृद्ध महिलेवर टोप्पाण्णा मायाप्या हुबनूर याने 12 ऑगस्ट रोजी तिच्या घरात बलात्कार केला होता.त्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी गेल्या 17 दिवसांपासून फरार आहे.उमदी पोलिसांना आरोपी पकडण्यात अपयश आले आहे. तेव्हा आरोपीला तात्काळ अटक करुन पीडित महिलेला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख तम्मा कुलाळ, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, युवा सेना तालुका प्रमुख नागनाथ मोटे, उपतालुका प्रमुख प्रवीण अवरादी, विजयराजे चव्हाण,श्रीमंत करपे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
