‘शरद’ च्या कृषीकन्यानी घेतले ड्रम रोलिंगचे प्रात्यक्षिक | सोन्याळची विद्यार्थींनी सहभागी

0सोन्याळ,वार्ताहर : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न,शरद कृषि महाविद्यालय,जैनापूर (ता.शिरोळ) येथील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ग्रामीण कृषि जागृती कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड (सन 2020-21) हा कार्यक्रम यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे   महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार,ऑनलाईन पद्धतीने,तसेच   विद्यार्थ्यांसाठी ते ज्या गावाचे रहिवाशी आहेत.

त्याच गावांमध्ये वर्क फ्रॉम होम पद्धतीने राबविला जात आहे.यात सोन्याळ ता.जत येथील विद्यार्थीनी वैशाली उमराणी हिने वर्क फ्रोम होम पध्दतीने राबविला.विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वत: चे गावे कार्यानुभवासाठी निवडले असून गावातील शेतकर्‍यांचे 

 जीवनमान,सामाजिक व आर्थिक विकास,शेतीसंबंधी व पिकासंबंधी सखोल माहिती याचा ते अभ्यास करत आहेत.शरद कृषि महाविद्यालय जैनापूरच्या कृषि कन्यानी त्यांच्या गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्याक्रमांतर्गत भुईमुग पिकामध्ये ड्रम रोलिंग कसे करावे,यावर प्रात्यक्षिक घेतले.
Rate Card

या प्रात्यक्षिका वेळी कृषिकन्यानी पेरणी नंतर 50 दिवसांनी भुईमुगावर ड्रम रोलिंग घ्यावे.त्यामुळे उत्पादनात वाढ होते.असे केल्यास भुईमुगाच्या शेंगाचे उत्पादन 10-15 टक्याने वाढते.जर पेरणीनंतर 50 दिवासांनी व 70 दिवसांनी असे दोन वेळा ड्रम रोलिंग केल्यास उत्पन्न वाढते.त्याचप्रमाणे ड्रम रोलिंग कसे करावे व कोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारचा ड्रम वापरावा व ड्रमचे किती आकारमान असे महत्वाचे मुद्दे कृषीकन्या वैशाली उमराणी यांनी पटवून दिले.प्रात्यक्षिक वेळी सोन्याळ येथील सिद्राय उमराणी,लोकप्पा बगली,आकाश बगली, शकुंतला बगली, शोभा बगली यांच्यासह महिला शेतकरी उपस्थित होत्या.            
संस्थेचे चेअरमन डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी हा उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या आहेत.प्राचार्य डॉ.शांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कृषी कार्यानुभव कार्यक्रम पार पाडला जात आहे.कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा.संजय फलके तसेच कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.सारिक कोळी,प्रा.स्वप्नाश्री गाट,प्रा.धिरज पोवार व डॉ. नम्रता पाटील हे काम पहात आहेत.ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव,कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमातर्गंत सोन्याळ ता.जत येथे ड्रम रोलिंगचे प्रात्याक्षिक दाखविले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.