आवंढीत कोरोना मुक्तांचे जंगी स्वागत

0आवंढी,वार्ताहर  : आवंढी ता.जत येथे मागील पंधरवड्यात नवीन चार रुग्ण सापडले होते.यातील तीन रुग्णांना उपचारासाठी जत येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते, तर एका वयोवृद्धाची प्रकृत्ती खालावल्याने त्यांना सांगलीला उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या व्यक्तिचा मृत्यू  झाला होता.जत कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन आलेले माजी उपसरपंच अनिल कोळी,  सौ.कोळी व अमोल पाटील हे तिघे सुखरूप गावात परतले.ग्रामस्थांनी या तिघांचेही फेटा,पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत भावी निरोगी जिवनास शुभेच्छा दिल्या.
Rate Card


यावेळी जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब कोडग बोलताना म्हणाले की,कोरोना या रोगाच्या काळात प्रत्येकाने स्व:ताची काळजी स्वतः घेतली पाहिजे.कोरोनाग्रस्त व क्वारंटाईन लोकांचा तिरस्कार व हेवेदावे न करता त्यांना धीर दिला पाहिजे.यावेळी माजी उपसरपंच डॉ.प्रदिप कोडग व चंद्रकांत कोडग सर यांनीही मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी कोरोनाने मृत्यू झालेल्या  दोघांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  सोसायटीचे चेअरमन माणिक पाटील,मेजर बबन कोळी,आण्णासाहेब भाऊसो बाबर,सतिश कोडग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आंवढी ता.जत येथे कोरोना मुक्त नागरिकांचे स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.