मुंबई : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्या समवेत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या कालावधीत राज्यातील पतसंस्थाना आलेल्या अडचणी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जाणून घेतल्या.राज्यात कार्यरत असणार्या 22000 पतसंस्थांमध्ये 4.5 लाख कर्मचारी काम करतात. सहकार क्षेत्रातील पतसंस्था चळवळीला बळकटी देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्या फेडरेशनने मांडल्या. प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल.
पतसंस्थाना एका वेब पोर्टलवर आणून 101 चे दाखले ऑनलाईन देण्याचे, शासकीय कागदपत्रांकरीता पतसंस्थांना शासकीय कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न करू. अहमदनगर जिल्ह्याप्रमाणे पतसंस्थांनी जिल्हानिहाय स्थैर्य निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करावेत.यावेळी सहकार आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, प्रदेश उपाध्यक्ष सांगलीचे सुरेश पाटील, सुरेश वाबळे, सर्जेराव शिंदे, सुरेखा लवांडे, संग्राम पाटील, लक्ष्मण गायकवाड, रवींद्र बोरावके, रमेश शिंगटे, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.





