माध्यमिक शाळाच्या शिक्षकांचे पगार वेळेत द्या
जत,प्रतिनिधी : गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त ऑगष्ट पेड इन संप्टेबरचे वेतन विशेष बाब म्हणून 27 /8/2020 पुर्वी अगोदर द्यावा,अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ(फेडरेशन)सांगली यांच्या वतीने करण्यात आली.तसे निवेदन जिल्हाध्यक्ष हाजीसाहेब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व अप्पर सचिव (शिक्षण,क्रिडा विभाग) यांना दिले.

निवेदनात सध्या कोरोना काळात शिक्षक आर्थिक अडचणीत असल्याने
गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त ऑगष्ट पेड इन संप्टेबरचे वेतन विशेष बाब म्हणून 27 /8/2020 पुर्वी अगोदर द्यावा,त्याशिवाय पुढील प्रत्येक महिन्याचे वेतन 1तारखेलाच अदा करावेत,असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी बळीराम कसाबे,एन.डी.कांबळे, प्रमिला साळे,वेडांडे सर, चंद्रकांत ऐवळे सर उपस्थित होते.
माध्यमिक शाळेतील शिक्षकाचे पगार वेळेत द्यावेत या मागणीचे उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांना निवेदन देताना हाजीसाहेब मुजावर व पदाधिकारी
