पांढरेवाडी,आंसगीतुर्क,खंडनाळ,रेवनाळ पाणी योजनाची रखडलेली कामे तात्काळ करा

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पांढरेवाडी,आंसगीतुर्क,खंडनाळ व रेवनाळ येथील भारत निर्माण पाणी योजनाची कामे रखडल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.पाणी टंचाई संपावी म्हणून या गावांना शासनाने आठ वर्षापुर्वी भारत निर्माण योजनेअंतर्गत मोठा निधी दिला आहे.प्रत्यक्षात निधी खर्च झाला आहे.मात्र कामे झाली नाहीत.त्यामुळे एकतर योजना आहे.मंजूर टँकर मिळत नाही.दुसरीकडे संबधित यंत्रणा कामे करत नसल्याने नागरिक यात भरडले जात आहेत.तातडीने या गावातील योजनाची पाणी योजनाची कामे करावीत,अन्यथा ग्रामस्थासह आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिला आहे.

पांढरेवाडी येथील पाणी योजनेची विहिर,पाईपलाईनसह अंतर्गत कामे अपुर्ण आहेत.निधी मात्र सर्व खर्च झाला आहे.संबधितांना विचारणा केली असता लवादाकडे केस दाखल आहे म्हणून काम रखडले म्हणून उत्तरे दिली जात आहेत.प्रत्यक्षात या योजनेमुळे येथे दुसरे कामही करता येत नाही.नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ आली आहे.


Rate Card
आंसगीतुर्क येथेही मोठ्या निधीची योजना मंजूर झाली आहे.प्रत्यक्षात कामे पुर्ण झाली म्हणून निधी खर्च झाला आहे.येथे  वाडीवस्तीची पाईपलाईन न करताच पैसे काढले आहेत.त्याशिवाय अनेक कामे अपुर्ण आहेत.पाणी योजना बंद आहे.लवादामध्ये केस दाखल आहे,म्हणून येथेही उत्तरे देऊन वेळ मारून नेहत आहेत.

खंडनाळ मध्येही भारत निर्माण योजनेचे काम करण्यात आले आहे.येथे पाईपलाईन पुर्ण,विहिर,टाकी व अन्य कामे अर्धवट सोडण्यात आले आहेत.निधी मात्र खर्च झाला आहे.

रेवनाळ येथे जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत पाणी योजना करण्यात आली आहे.येथील पाणी पुरवठा करणारी टाकी कालबाह्य झाली आहे.ती कधी पडेल यांचा नेम ऩाही.नव्याने टाकी व पाणी पुरवठा योजना मंजूर करावी म्हणून गेल्या दीड वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे.मात्र मुर्दाड पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी दखल घेत नाहीत.सध्या चारही गावात पाणी असूनही पाणी पुरवठा योजना नसल्याने पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत.लाखो रुपयाचा निधी योजनावर खर्च झाला आहे.तरीही कामे रखडविण्यात आली आहेत.यांची तात्काळ चौकशी करून कामे पुर्ण करावीत,अन्यथा प्रशासनाला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशाराही सरदार पाटील यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.