जतेत मुद्रांक विक्रेत्याकडून नागरिकांची लुट | कारवाईची मागणीसाठी नाथा पाटील यांचे निवेदन

0जत,प्रतिनिधी : जत येथे मुद्रांक विक्रेते व दुय्यम निबंधक यांच्या संगनमताच्या साखळीतून होत असलेली जनतेची मोठ्या प्रमाणातील लुबाडणूक थांबवावी अशी मागणी,युवा नेते नाथा पाटील यांनी केली आहे.तसे निवेदन त्यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना दिले आहे.

पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत दुय्यम निबंधक कार्यालयाकडे 14 मुंद्राक विक्रेते असून त्यातील 3 विक्रेते यांना तहसिल कार्यालय आवारात जागा देण्यात आल्याचे समजते तर उर्वरीत 11 हे नुतन स्थलांतरीत जागेत निबंधक कार्यालयात बसतात. तहसिल कार्यालय आवारातील मुंद्राक विक्रेते हे कार्यालयीन वेळेत जागेवर थांबत नाहीत.Rate Card


जे उपस्थित आहेत ते नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. तसेच स्टँप जादा दराने विक्री करतात. जत तालुका हा विस्ताराने खूप मोठा असून अनेक खेडोपाड्यातील लोक विविध कामासाठी स्टॅम्प घेण्यासाठी येत असतात. शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी स्टॅम्प लागतात. यासाठी हेच हेरुन काही स्टॅम्पवाल्यांनी बाजार मांडला आहे. त्यांच्याकडुन जादा 10 रुपये घेतले जातात. काही मुद्रांक विक्रेते यांचेकडुन संगनमताने जाणीव पुर्वक ग्राहकांना त्रास देण्याचा उद्देशाने अडवणूक करतात. तसेच ग्रामीण भागातून येणारे लोक हे काम धंदा बुडवुन आलेले असतात व पुन्हा दुसऱ्या दिवशी स्टम्प खरेदीसाठी येणे शक्य नसल्याने ते जादा रक्कम देण्यास तयार झाल्यानंतर स्टॅम्प देतात.अशी मुद्रांक विक्रेत्यांकडून जनतेची उघडपणे लुबाडणुक करीत आहेत.


तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात  खरेदी विक्री व्यवहारासाठी दुय्यम निंबधकांना पैसे द्यावे लागतात,आमचे वेगळे पैसे असे शासनाच्या नियामपेक्षा जास्त पैसे दस्त नोंदीसाठी मुद्रांक विक्रेते लुटत आहेत.हे पैसे दिल्याशिवाय दस्ताची नोंदणीचे काम केले जात नसल्याचा आरोपही नाथा पाटील यांनी केला आहे.त्याशिवाय दस्त करण्याचे क्रंमाक आर्थिक तडजोडीतून मागेपुढे करण्यात येतात.अनेक वेळा सर्व्हर बंद पडल्याचे कारण देत दस्त नोंदणीचे काम अडकविले जात असल्याने नागरिकांना नाहक आर्थिक, व त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ही लुबाडणूक तहसीलदार यांनी रोकावी,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही पाटील यांनी निवेदनात केला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.