संखमधील महिला अत्याचार प्रकरण आरोपीला तात्काळ अटक करा | आक्रोश मोर्चा ; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा

0संख,वार्ताहर : संख ता.जत येथील वयोवृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी दलित पँथर व रिपाईच्या वतीने नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संख तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.यात आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सहभागी होत पाठिंबा दिला.


संख येथील 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या टोप्पाण्णा मायाप्पा हुबनूर या आरोपीने अत्याचार केले आहेत.घटना ता.12 ऑगष्ट रोजी घडली आहे.आरोपी विरोधात बलात्कारांचा गंभीर गुन्हा घडूनही त्याला अद्यापपर्यत पोलीसांनी अटक केलेली नाही.या आरोपीला उमदी पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.पिडित महिलेला तात्काळ न्याय मिळावा या मागणीसाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.मंगळवार सकाळी गाव कडकडीत बंद ठेवत आंबेडकर चौकापासून मोर्चा काढण्यात आला.
Rate Card


आरोपीला तात्काळ अटक करा,अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देत अप्पर तहसीलदार प्रंशात पिसाळ यांना निवेदन देण्यात आले.दरम्याऩ प्रभारी उप विभागीय अधिकारी संदिपसिंह गिल यांनी भेट देत,स्व:ता लक्ष आरोपीला अटक करू,असे आश्वासन दिले.पँथरचे तालुकाध्यक्ष अमर कांबळे,रिपाईचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हुवाळे,संजय देवनाळकर,राकेश कांबळे,मच्छिंद्र धाबेकर,चित्रसेन कदम,ईराप्पा केंगार,शबीर नदाफ, दलित पँथर व रिपाईचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

संख येथील वयोवृद्ध महिलेवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी,या मागणीचे निवेदन देताना आ.विक्रमसिंह सांवत,भूपेंद्र कांबळे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.