संख तलावात सिंचन योजनेतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न | आमदार विक्रमसिंह सांवत ; तलावाच्या दुरूस्ती कामाचा शुभारंभ

0संख,वार्ताहर : संख मध्यम प्रकल्पाच्या कँनालची स्वच्छता,अधिग्रहण मोबदला प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन पातळीवर काय पाठपुरावा झाला.याची माहिती घेत,हा प्रश्न लवकरच मार्गी लावू,भविष्यात विस्तारित म्हैसाळ सिंचन योजना, कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेतून पाणी आणून या भागातील दुष्काळ हटविणारच,अशी ग्वाही आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली.
संख (ता.जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कँनॉलची स्वच्छता कामाचा शुभारंभ आमदार सांवत यांच्याहस्ते झाला.त्यावेळी ते बोलत होते.जलसंपदा विभाग यांत्रिकी विभागाकडून कँनॉलची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे.

आ.सावंत म्हणाले की,पुर्व भागातील अनेक गावांना वरदान ठरणारा हा तालुक्यातील सर्वात मोठा तलाव अवर्षणामुळे भरू शकला नाही.निसर्गाच्या अवकृपेने अपेक्षित पाऊस पडत नाही.परिणामी पाऊस पडत नसल्याने शेतीचे मोठे क्षेत्र शाश्वत पाणी नसल्याने अडचणीत आहे.त्यामुळे आता या तलावात कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे.सध्या तलावासह कँनॉलची दुरूस्तीची कामे सुरू केली आहेत.

जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाकडून स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
Rate Card


डाव्या व उजव्या कँनलची स्वच्छताचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी सोडवावे यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.त्याचबरोबर या भागात कायमस्वरूपी सिंचन योजनेसाठी म्हैसाळ योजनेतून नवीन योजना करावी यासाठी शासनाकडे मी मागणी केली आहे.येत्या काही वर्षात या तलावात बारामहिने पाणी उपलब्ध असे नियोजन आहे,असेही आमदार सांवत म्हणाले.
अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ,जलसंपदा विभागाचे उपअभियंता व्ही.ए.मंजुनाथ,

ए.पी.कुंभार,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जी.के.पुरोहित, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिरादार,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, माजी सभापती बाबासाहेब  कोडग,शाखा अभियंता मोरे, माजी उपसरपंच एम.आर.जिगजेणी,मंडल अधिकारी मनोहर कोळी,कालवा निरीक्षक शेख आदी उपस्थित होते.

अप्पर तहसीलदार कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली.या बैठकीत मध्यम प्रकल्प,तलाव अधिग्रहण मोबदला मिळण्यासाठी प्रशासन पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी प्रांताधिकारी यांच्या उपस्थित बैठक लावली जाणार असल्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बैठकीनंतर सांगितले.
संख (ता.जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या कँनाल स्वच्छता शुभारंभ आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते झाला.यावेळी अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ,उपअभियंता व्ही.ए.मंजुनाथ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.