डफळापूरच्या हॉटेल मनोहरचे मालक गुरूपादप्पा सिद्राया महाजन यांचा 26 ऑगष्टला 87 वा वाढदिवस आहे,त्यानिमित्त…
सर्वसामान्य कुटूंबात जन्मल्यानंतर स्वत:च्या व कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी पडेल ते कष्ट करत विविध प्रकारचे लहान मोठे व्यवसाय करत आपल्या अंगभूत हुशारी,कौशल्य,प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर व्यवसाय यशस्वी करून सारी क्षितीजे पार करत यश संपादन केले आहे.
परमेश्वर सर्व कार्य आपल्याकडून करून घेत असतो,आपण निमित्तमात्र असतो. डफळापूरच्या प्रसिद्ध हॉटेल परपरंचा पाया त्यांच्या वडिलांनी 1933 साली घालुन दहा बाय दहाच्या खोलीतून सुरू केलेले हॉटेल मनोहर हे आता जत तालुक्यातील प्रसिद्ध हॉटेल बनले आहे.डफळापूरचा मिसळपाव,मारामारी (चहाचा प्रकार)पेढा ला त्यांनी ब्रँड बनविला आहे. त्यांच्या स्वादिष्ट पुरीभाजी,मिसळपाव,मारामारी पेढा खाण्यासाठी खवव्याची गर्दी असते.नंतर कालांतराने बदलत त्याच्या दोन मुलांनी डफळापूर बाजार पेठेत सुसज्ज,सर्वसोयी युक्त हॉटेल उभारले आहे.
ग्रामीण भागात एखांदा व्यवसाय कसा ग्राहकांच्या प्रसिध्दीस उतरवयाचा याची कला महाजन बंधुना आहे.गुरूपादप्पा सिद्राया महाजन हे महाजन बन्धूतील प्रगतशील व्यवसायिक आहेत.
त्यांना पाच मुले व एक मुलगी असून 2 मुले इतर व्यवसायात व एक मुलगा मुख्याध्यापक व 2 मुले व नातू हॉटेलचा व्यवसायचा वारसा पुढे चालवत आहेत, हे सर्व वडिलांची पुण्याई व त्याचीच प्रेरणा आहे.असे सर्व जण म्हणतात एकत्र कुटूंब पद्धती व एकमेकांना मदत करत कसं जगायचं हे त्यांनी शिकवलं सध्या महाजन हॉटेल कार्यभार त्याचे दोन चिरंजीव व दोन नातू बघत आहेत.