संख | शिक्षणमहर्षी डॉ.आर.के.पाटील यांना वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव

0जत,प्रतिनिधी : संख ता.जत येथे शैक्षणिक क्रांती आणणारे शिक्षणमहर्षी डॉ.आर.के.पाटील सर यांचा 74 वा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.बुधवारी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी थेट भेटत,फोन,सोशल मिडियावरून शुभेच्छाचा वर्षाव केला.डॉ.पाटील यांनी संस्थेच्या कार्यालयात सोशल डिस्टसिंग पाळत शुभेच्छा स्विकारल्या.
संखमध्ये अगदी मठातून सुरू झालेल्या श्री.शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचा दरिबडची रोडलगत सुमारे 25 एकर परिसरात संस्थेचा विस्तार करत नर्सरी ते पदवीपर्यतच्या शिक्षणांची सोय केली आहे. संख सारख्या ग्रामीण भागात दुर्लक्षित शेतमजूर,ऊसतोड कामगार,व गरिबांची मुले शिकली पाहिजेत म्हणून उभे केले वसतीगृहासह हे ज्ञानमंदिर अनेकांच्या जीवनाची दिशा बनले आहे.या ज्ञानमंदिराला दैवत्व आणणारे शिक्षणमहर्षी डॉ.आर.के.पाटील यांचा 74 व्या वाढदिवस प्रवणी ठरला.शेकडो मान्यवरांच्या शुभेच्छांनी डॉ.पाटील सर भारावून गेले.


Rate Cardजय भारत वेब चँनेल दिनराज वाघमारे,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,रियाज जमादार यांनीही डॉ. पाटील यांचा वाढदिवसानिमित्य शाल,पुष्पहार,श्रीफळ देत सत्कार करत दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.त्यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक संकेत टाइम्सने काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशनही डॉ.पाटील यांच्याहस्ते केले.

यावेळी त्यांनी वाघमारे व माळी यांच्याशी संवाद साधला,डॉ.पाटील सर संस्थेचा इतका विस्तार वाढवेपर्यत केलेल्या संघर्ष, त्यागाची माहिती देताना भावूक झाले.डॉ.आर.के.पाटील महाविद्यालयाची भव्य इमारतीसह,व्यवसाय शिक्षणासाठी आयटीआय कॉलेज सुरू करण्याचा मानस डॉ.पाटील यांनी यावेळी बोलून दाखविला.आज मी उभे केलेले शैक्षणिक संकुल या भागात परिवर्तन आणेल,असेही ते म्हणाले.
संख ता.जत येथील शिक्षणमहर्षी डॉ.आर.के.पाटील यांच्या वाढदिनी सत्कार करताना जय भारत वेब चँनेलचे संपादक दिनराज वाघमारे,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,पत्रकार रियाज जमादार

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.