जत,प्रतिनिधी : जत शहरातील जिल्हा
बँकेचे मार्केट यार्ड शाखे अतर्गंत विस्तीय 7/12 उतारा नसतानाही कर्जवाटप करत महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याप्रकरणी मुख्य लाभार्थी,सोसायटीचे सचिव,व त्यांना सहकार्य करणारे बँकचे शेती अधिकारी यांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी शासकीय लेखा परिक्षक वर्ग 1 अरूण शिवाजी सोनार,रा.सांगली यांनी पोलीसात फिर्साद दिली आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्तीचा वित्तीय संस्थेमध्ये 7/12 नसतानाही कर्जवाटप करून योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने शासकीय लेखा प्रशिक्षकांमार्फत तपासणीचे आदेश दिले होते.
त्यानुसार लाभार्थी श्रीमती शेकव्वा रायाप्पा संती रा.मेढिंगीरी यांनी जमीन नसतानाही 8,309 रुपयाचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँके अंतर्गत विकास सोसायटीतून 7/12 नसतानाही कर्ज घेत योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शनास आले होते.7/12 नसतानही मुख्य लाभार्थी श्रीमती संती,सोसायटीचे सचिव मुरग्याप्पा गुरूसिध्दा हिप्परगी,रा.रावळगुडेवाडी,व त्यांना सहकार्य करत बँकेचे शेती अधिकारी गुरूबसू इराप्पा दुंडी,रा.जत यांनी संगनमताने कर्ज काढून महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.त्यानुसार शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.