जतची कोरोना बाधित संख्या शंभरीकडे | कोरोना रोकण्यात प्रशानसाची हातबलता ; नागरिक बेफीकीर

0



जत,प्रतिनिधी : जत शहरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या 95 वर पोहचली आहे.बिळूर नंतर जत शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे.शहरात आरोग्य विभाग,महसूल विभाग,पोलीस, नगरपरिषदचे कोरोना रुग्ण रोकण्यात अपयशी ठरले आहेत.






Rate Card

शहरातील कोरोनाचा झपाट्याने वाढणारा प्रभाव रोकण्यासाठी नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीसाकडून समन्वय साधून काम करण्याची गरज आहे.त्याला पदाधिकारी, नागरिकांनी सहकार्य करण्याचीही गरज आहे.


प्रशासनाचे नियम पायदळी


जत शहरात प्रशासनाकडून कोरोना रोकावा यासाठी मास्क वापरणे,सोशल डिस्टिसिंग पाळणे,सँनीटायझर वापरणे याबाबत नागरिक गांर्भिर्याने घेत नसल्याचे स्पष्ट आहे.शहरात विना मास्क खुलेआम नागरिक फिरत आहेत.शहरात गर्दीला कोणीही अटकाव करताना दिसत नाही.अपवाद वगळता दुकानदाराकडून काळजी घेतली नसल्याचे दिसत आहे.कंन्टेनमेट झोन फक्त कागदपत्री दिसत आहेत.प्रत्यक्षात कोणही झोनचे नियम पाळत नसल्याचे समो



र येत आहे. येथे सुरक्षेसाठी पोलीस नसतात.होमगार्डवर काम चालविले जात आहे.त्यांना नागरिक जुमानत नाहीत.परिणामी शहरातील कोरोना बाधित सातत्याने आढळून येत आहेत.ही संख्या आता शंभरीकडे गेली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.