शहरातील महामार्ग कामाला पुन्हा कधीचा मुहुर्त खड्ड्याच्या वाहनधारकांचे बेहाल ; का थाबंतेय सातत्याने मार्गाचे काम

0जत,प्रतिनिधी : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम पुन्हा थांबले आहे.गत काही दिवसात सातत्याने पाऊस पडत असल्याने काम बंद राहणे क्रमप्राप्त होते.मात्र गेल्या तीन दिवसापासून पाऊस बंद झाला आहे. तरीही काम सुरू झाले नसल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.


.

मुळात गेल्या वर्ष भरापासून शहरातील या महामार्गाला ग्रहण लागले आहेत.सातत्याने बदलणारी मोजणी,बदलेले सरकार,उदासीन पदाधिकारी, नागरिकांचा विरोध,नगरपरिषदेचा हालगर्जीपणा यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे बेहाल होत आहे. शहरातील सुमारे दोन किलोमीटरचे काम वर्षभरापासून अनेक कारणांनी रखडले आहे.आजी,माजी आमदारांनी कडक भूमिका घेऊनही सातत्याने कामाला खंड पडला जात आहे.गेल्या पंधवड्यात सुरू असलेले काम पुन्हा बंद पडले आहे.हॉटेल संस्कृत्ती पासून निगडी कॉर्नरपर्यत एका बाजूचे सिमेंट क्रॉकिटीकरण करण्यात आले आहे.त्यापुढील मार्केट यार्ड समोरील रस्त्याचे मजबूतीकरणाचे काम आठवड्यानंतर बंद करण्यात आले आहे.


Rate Card
उर्वरित इतर रस्त्यावर तीन तीन फुटापर्यत खड्डे पडले आहेत.त्यातून जाताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत.रिमझीम पावसात रस्त्याची अवस्था भयानक होत आहे.चिखल होऊन घसरगुंडी बनली जात आहे. नेमके रस्त्याच्या या कामाला खंड का पडला जातो,यांचा निष्कर्ष काढणे कठीण होऊन बसले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.