कोसारीत तरूणांची आत्महत्या

0जत,प्रतिनिधी : कोसारी (ता.जत) येथे पत्नी सोबत झालेल्या भांडणाच्या रागातून पतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.सचिन तुकाराम कोळी (वय 38,रा.कोसारी, ता.जत) असे मृताचे नाव असून रविवारी पहाटे घटना घडली.याबाबत जत पोलिस ठाण्यात उपसरपंच बाळासो रावसो पवार यांनी फिर्याद दिली आहे. 
Rate Card

 आज सकाळी 7.30 वाजण्याच्या पूर्वी वसंत आबा मोरे यांच्या विहिरीत सचिन कोळी यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस नाईक हाक्के करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.