संखमध्ये एक गाव एक गणपती बसवण्याचा निर्णय

0संख,वार्ताहर : संख (ता.जत) येथे  कोरोनाच्या महामहारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळाची बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत गावात एक गाव एक गणपती बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय सरपंच सौ मंगलताई पाटील,उपसरपंच दर्गाकर,पोलीस पाटील सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला.बैठकीला सोसायटीचे चेअरमन प्रा.आर.बी.पाटील,व्हा.चेअरमन शरणाप्पा शिळीन,ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सध्या संखसह परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.भविष्यात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,त्यामुळे गावात एक गाव एक गणपती बसवावेत असे आवाहन पोलीसांनी केले होते.त्यांनुसार ग्रामपंचायतीत झालेल्या बैठकीत संखमध्ये एक गाव एक गणपती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  


Rate Card


संरपच मंगलताई पाटील म्हणाल्या,गावात कोरोना प्रभाव आटोक्यात आहे.सर्व स्तरातील अधिकारी,पदाधिकारी, ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे गावात कोरोनाचे रुग्ण वाढलेले नाहीत.सध्या गणेशोत्सव आहे.त्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये,यासाठी सा.पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांनी एक गाव एक गणपती बसवावा,असे आवाहन केले होते.त्यानुसार आम्ही सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावाच्या हितासाठी सर्व मंडळांनी एकच गणपती बसविण्याचा स्तुत निर्णय घेतला आहे.यामुळे गावात धार्मिक वातावरणासह कोरोना फैलाव रोकणे शक्य होणार आहे. आम्ही सर्व मंडळाचे आभारी आहोत असेही संरपच पाटील म्हणाल्या.
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.