अभिजीत चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा | कोरोना योध्दा डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविकाचा गौरव
डफळापूर, वार्ताहर : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजीत दादा चव्हाण यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त डफळापूर जिल्हा परिषद गटातील कोरोना काळात प्रभावी काम करत कोरोना योध्दा असणारे डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स,नर्स,कर्मचारी,खाजगी डॉक्टर्स,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,पत्रकार,विद्युत कर्मचारी,पोलीस पाटील,औषध विक्रेते,सामाजिक कार्यकर्त्याचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करत त्यांना कोरोना योध्दा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
आमदार विक्रमसिंह सांवत यांनी अभिजीत चव्हाण यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार घालून सत्कार केला.दरम्यान अभिजीत दादा यांच्यावर दिवसभर शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. बुधवार सकाळ पासून चव्हाण यांनी त्यांच्या डफळापूर येथील जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा स्विकारल्या.जत पश्चिम भागातील कॉग्रेसचे युवक नेते म्हणून चव्हाण याचा मोठा प्रभाव आहे.त्यामुळे जत पश्चिम भागातील अनेक पदाधिकारी, मान्यवर,युवकांनी अभिजीत दादांना प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,बाळासाहेब चव्हाण,रमेश चव्हाण,बाबासाहेब माळी,अशोक सवदे,भारत गायकवाड,डॉ.माधूरी तोडकर,सागर चव्हाण, शंकर वगरे,राजू चौगुले, दिपक लंगोटे,आंनदा सिंदवडे, तानाजी चव्हाण,अब्दुल मकानदार,देवदास पाटील,सुभाष पाटोळे,अशोक भोसले,तानाजी चव्हाण, उत्तम संकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय सुर्यवंशी,कॉ.हणमंत कोळी,अमित नदाफ,गोटू शिंदे,सुरज महाजन,दिपक कांबळे यांनी नियोजन तर सुरेंद्र सरनाईक यांनी सुत्रसंचलन केले.
बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्त कोरोना योध्दा आशा वर्कर्स यांचा गौरव करण्यात आला.अभिजीत चव्हाण यांचा आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
