जत तालुक्यात पुन्हा 11 जण कोरोना पॉझिटिव्ह

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शुक्रवारी पुन्हा 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली,जालीहाळ बु. येथे एकाच दिवसात 6 रुग्ण रँपीड तपासणीत आढळले आहेत.यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 271 वर पोहचली आहे.तालुक्यात जालिहाळ बु.6,जत 4,बिळूर 1 असे आकरा रुग्ण आढळून आले आहेत.जालीहाळ बु.येथील एका मुलीला त्रास जाणवू लागल्यानंतर तिच्या घरातील सर्वाची रँपीड टेस्ट घेण्यात आली.

Rate Cardत्यात सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.ते कर्नाटकातील संपर्कातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.त्यातील जास्त लक्षणे दिसत असलेल्या रुग्णाला जत कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. तर पाच जणांना होम क्वांरटाईन दरम्यान सर्व ठिकाणीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहेत.आरोग्य पथके आजपासून तपासणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.