तालुक्याच्या प्रश्नासाठी श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटना लढणार ; तुकाराम बाबा | जत तालुक्यात जलक्रांतीसाठी जल चळवळ उभारणार

0
3



जत,प्रतिनिधी : दुष्काळी जत तालुक्यातील पश्नासाठी यापुढे श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटना लढा उभारणार आहे.सामाजहिताचे प्रश्नासाठी तालुक्यात मानव मित्र आता दक्ष असतील.तालुक्यात जलक्रांती आणण्यासाठी जल चळवळ उभा करून तालुक्यातील अखेरच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी आम्ही संघर्ष करणार आहोत,अशी ग्वाही चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा यांनी दिली.







तालुक्यातील गोंधळेवाडी येथे श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटनेची महत्वपुर्ण बैठक चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी प्रशांत कांबळे,रूपेश पिसाळ,सुरज मणेर,सिद्धनाथ ऐवले,विनोद भोसले,विवेक टेंगले,रवी शिंदे,किरण कोळी,खिल्लारे सर बागलवाडी,रामदास शिंदे,रामचंद्र रणशिंग, संजय कांबळे,विक्रम कांबळे,गंगाधर हिरगौड, विलास राठोड,दादासाहेब सबकाळे,बाळासाहेब मोटे,संतोष व्हनमोरे, गंगाधर कांबळे,जयदीप मोरे,आमसिद्ध सरगर आदी मानवमित्र उपस्थित होते.

यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेची भूमिका, पुढील वाटचाल व मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणारे विविध सामाजिक कार्याची माहिती विषध केली.







मानव मित्र संघटना ही पूर्णतः राजकारण विरहित राहणार असल्याचे स्पष्ट करत तुकाराम बाबा महाराज म्हणाले सामाजिक कार्य करताना आपण समाजाचे देणे लागतो हाच हेतू मनात ठेवून सर्वानी निस्वार्थपणे काम करायचे आहे. शक्य ती मदत व बळ मानव मित्र संघटनेला देण्यात येणार आहे. 







मानव मित्र संघटना राज्यभर उभारण्याचा संकल्प

मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून जत तालुक्यात कामे केल्यानंतर हीच संकल्पना आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार आहेत.श्रीसंत गांगडेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाप्रमाणे श्रीसंत बागडेबाबा मानव मित्र संघटना ही संकल्पना राज्यभर राबवावी अशी विनंती करणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.






 पाच हजाराची तात्काळ मदत देणार

जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देण्यासाठी मानव मित्र संघटना तत्पर आहे. तालुक्यात एखाद्याचे घर जळाले किंवा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले अशा लोकांना मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून पाच हजारची मदत देण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.








रुग्णवाहिकेची मांडली संकल्पना

अपघातग्रस्तांना, गरजू रुग्णांना तात्काळ मदत मिळावी यासाठी श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून चार रुग्णवाहिका घेण्याचे नियोजन आखले आहे. तूर्तास मानव मित्र संघटनेच्या सदस्यांकडे जे वाहने उपलब्ध आहेत त्या वाहनांच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.







पाणी मिळेपर्यत संघर्ष सुरूच राहणार

दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यत पाणी मिळालेच पाहिजे ही आपली आग्रही भूमिका आहे. याच भूमिकेतून माडग्याळ येथे पाणी परिषद घेतली. पाण्यासाठी 450 कि.मी. संख ते मुंबई पायी दिंडी काढली.आजही शासन स्तरावर जतला पाणी द्यावे यासाठी आपला पाठपुरावा व लढा सुरुच आहे. जतला पाणी मिळेपर्यत निस्वार्थ भावनेतून पाण्याचा हा लढा सुरूच राहणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.








राजकारण नव्हे तालुक्यात जलक्रांती आणण्याची महत्वाकांक्षा

आपण जेव्हा काम सुरू केले तेव्हा अनेकांनी तुकाराम बाबा महाराज आमदारकीची निवडणूक लढविणार, बाबांची आमदारकी तयारी सुरू आहे,अशी चर्चा केली जाते पण त्या चर्चेला अर्थ नसल्याचे स्पष्ट करत तुकाराम बाबा महाराज म्हणाले, आपण जे सामाजिक कार्य करत आहोत ते जतकरांसाठी , दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी करत आहोत. जत तालुक्यात जलचळवळ उभारून पाणी आणणे हाच आपला मुख्य उद्देश आहे. राजकारण नव्हे तर तालुक्यात जलक्रांती घडविण्याचे आमचे स्वप्न आहे.तेच डोक्यात ठेवून आपले कार्य सुरू असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.







लोकसहभागातून कामे करण्यास परवानगी द्या

जत पूर्व भागात म्हैसाळचे पाणी येवू शकते. शासन निधी नाही म्हणून कामे थांबवत असेल तर आम्हाला लोकसहभागातून कामे करण्यास परवानगी द्यावी अशी आपली शासनाकडे केली आहे। त्यांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. लोकसहभागातून कामे करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी पुनश्च केली.




श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या बैठकीत मानव मित्र संघटनेच्या प्रमुख सदस्यांना मार्गदर्शन करताना चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here