ग्रामपंचायतीत कोरोनाचा लाभ घेत भष्ट्राचार बळावले

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत कोरोनाचा फायदा घेत नियमबाह्य कामे घुसडून लाखोचा भष्ट्राचार होत असल्याचे समोर येत आहे.अनेक गावातील अशा कामावर तक्रारी होऊ लागल्याने कामे रखडली आहेत.तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने अनेक गावे लॉकडाऊन करण्यात येत आहेत.





त्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने ग्रामस्थांनी घरी राहणेच पंसत केले आहे.त्याचा फायदा घेत काही ग्रामपंचायतीतील पदाधिकाऱ्यांनी मनमानी करत कोणत्याही ऑनलाइन निविदा न काढता विकासकामे सुरू केली आहेत.14,15 वा वित्त आयोग, विशेष योजनेतून अशी अनेक कामे घुसडण्यात येत आहेत.पैसे मिळवून देणारी कामे करण्यावर पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे.




Rate Card





अशी कामे घेण्यावरून हाणामारी पर्यत प्रकरणे गेली आहेत.सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे पाच-पाच लाखाची कामे ऑनलाइन निविदा न काढताच सुरू करण्यात आल्याची उदाहरणे आहेत.या सर्व प्रकाराला पंचायत समितीचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून टक्केवारी मुळे हिरवा कंदिल दाखविला जात आहे.बोगस,नियमबाह्य कामावर पैसे खर्च करून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे प्रकार थांबवावेत अशी मागणी होत आहे.


  

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.