जतची आरोग्य व्यवस्था मजबूत करा | प्रकाश जमदाडे यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

0
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील माडग्याळ व जत ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुविधा तात्काळ उपलब्ध कराव्यात अशी मागणी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सध्या तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे.त्याला रोकण्यासाठी आरोग्य विभाग काम करत आहे.पंरतू रिक्त पदामुळे त्यांना मर्यादा पडत आहेत.तालुक्यात 2 ग्रामीण रूग्णालय, 8 प्राथमिक आरोग्य केंद्र व 43 उपकेंद्र कार्यरत आहे. परंतु यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी तसेच उपकरणे उपलब्ध नाहीत.तेथे कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे आरोग्य सेवा देताना रुग्णांना फटका बसत आहे.


माडग्याळ येथे सुमारे 8 कोटी रू खर्चून ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. अद्यावत इमारत व निवासस्थाने आहेत,परंतू ग्रामीण रूग्णालय स्थापन झालेपासून वैद्यकीय अधिक्षक (वर्ग 1) प्रभारी आहे.डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांची 16 पदे रिक्त आहेत. ग्रामीण रूग्णालयासठी आवश्यक असणारी उपकरणे,प्रयोगशाळा, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन, 108 नंबर रूग्णवाहीका तसेच पोस्ट मार्टम रूममध्ये कोणतीही सुविधा नाहीत.त्यामुळे दर्जा ग्रामीण रुग्णालयचा मात्र  उपचार प्राथमिक अशी स्थिती आहे.

जत शहराच्या 50 हजार लोकसंख्येसाठी सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे.गेल्या वर्षी या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे.त्यांच्या इमारतीचे कामही प्रगतीपथावर आहे.मात्र येथे रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या सातत्याने तक्रारी आहेत. रुग्णालयात कर्मचारी संख्या अपूरी आहे,तसेच उपचारासाठी लागणारी आवश्यक अशी कोणतीही उपकरणे नाहीत.कोणताही रूग्ण असला तरी त्यास मिरज किंवा सांगलीला पाठविण्याचे सोपस्कर या रुग्णालयातून पुर्ण केले जात आहे.कोरोनात तर येथे उपचारासाठी टाळाटाळ केल्याची उदाहरणे आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागाचे आरोग्याची जबाबदारी आठ आरोग्य केंद्रे व 43 उपकेंद्रावर आहेत.तेथील स्थिती प्रचंड वाईट आहे.या केंद्रात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांच्याकडे वळसंग व संख केंद्राचा अतिरिक्त कार्यभार आहे.त्यांच्याकडे जत शहरासह तालुक्याची कोरोना रोकण्याची,रुग्ण बरे करेपर्यंत अशी तिहेरी जबाबदारी आहे.

Rate Card

अनेक केंद्रात वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांची रिक्त पदे,उपकरणांचा मोठा दुष्काळ आहे.

संख प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागली आहे.त्यांची दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. उमदीत पोलीस ठाणे असल्याने पोस्ट मार्टम इमारत बांधण्यात आली आहे.त्या इमारतीपर्यत जाण्यासाठी साधा रस्ताही नाही.परिणामी पोलीसांना मृत्तदेहाचे माडग्याळ किंवा जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी जावे लागत आहेत.त्यात अनेक वेळा पुर्ण दिवस वेळ जात आहे.पोलीस कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांना ताटकळत थांबावे लागत आहे.
येथील पोस्टमार्टम विभाग तात्काळ चालू करण्यात यावा.तालुक्यातील 43 उपकेंद्रात 12 पदे रिक्त आहेत,सामुदायिक आरोग्य अधिकारी(सी.एच.ओ) कंत्राटी पगारावर नेमणूक केली आहे.परंतू त्यांनाही बऱ्याच दिवसापासून त्यांना पगार मिळालेला नाही.कायमस्वरूपी नर्सना 35 हजार,10 वर्षापासून काम करणाऱ्या नर्सना 12 हजार, कोव्हीडमधिल कंत्राटी नर्सना 18 हजार पगार आहे.या पगारामध्ये मोठ्या प्रमाणात तपावत आहे.त्यामुळे कामात अनियमितता येत आहे.मोठ्या इमारतीपेक्षा अपेक्षित औषधे, डॉक्टर्स,कर्मचारी नेमून तालुक्यातील आरोग्य व्यवस्था मजबूत करावी,अशीही मागणी जमदाडे यांनी निवेदनात केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.