डफळापूरात कोरोनाचा प्रवेश | तरूणाचा अहवाल आला पॉझिटिव्ह
डफळापूर, वार्ताहर ; डफळापूर ता.जत येथे अखेर कोरोनाने प्रवेश केला आहे.गावातील एका 34 वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे.त्याला त्रास होऊ लागल्याने त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अनेक दिवसापासून सावध असलेल्या डफळापूर मध्ये कोरोना दाखल झाल्याने चिंता वाढली आहे.दरम्यान महसूल,आरोग्य विभागाची पथके दाखल झाली आहेत.या तरूणाला कोठून कोरोनाची बाधा झाली व संपर्कातील लोकांची माहिती गोळा करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

दरम्यान ग्रामपंचायतीकडून बाधित तरूण राहत असलेल्या परिसरात औषध फवारणी करून निर्जूंतीकरण करण्यात आल्याची माहिती ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे यांनी दिली.
