जत शहरात कोरोनाने दोघांचा मुत्यू | 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह | डफळापूरमध्ये कोरोनाचा प्रवेश
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तर जत शहरातील दोघाजणाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.बाधितमध्ये जत शहर 4,डफळापूर 1,खैरावमधील 1 जणांचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 240 झाली आहे.तर 178 जण कोरोना मुक्त झाले आहेत.आतापर्यत 10 जणांचा मुत्यू झाला आहे.सध्या 52 पॉझिटिव्ह रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यात जत कोविड सेंटर 14,डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर(जत ग्रामीण रुग्णालय) 8 ; पॉझिटिव्ह 5,सस्पेक्टेड 3,सांगलीसह अन्य रुग्णालये 11जणांवर उपचार सुरू आहेत.एकूण 22 जण आयसोलेशमध्ये,तर 4 जण अलगीकरण संस्थेत दाखल आहेत.
जतेत कोरोना मुक्त होण्याची टक्केवारी 74 टक्के आहे.आरोग्य विभागाकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.नागरिकांनी भिती बाळगण्या पेक्षा आम्ही दिलेले आदेश पाळावेत,मास्क,सँनिटायझर, सोशल डिस्टसिंगचे नियम काटेकोर पाळावेत,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले.
