जत (प्रतिनिधी) : जत तालुक्यातील मेंढीगिरी येथील सोसायटीचे सदस्य व माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश नामदेव कांबळे (वय-45) यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मेंढीगिरी येथील कांबळे आपल्या स्वतः च्या शेतात मोटर चालू करण्यासाठी गेले असता दोन्ही वायर एकत्र झाल्याने त्यांना शॉक लागून जागीच मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहेत.कॉग्रेसचे सक्रीय सदस्य म्हणून ते कार्यरत होते.





