आंवढीत दुध संकलनाला बंदी,अवैध धंद्यांना बळ | प्रशासनाच्या तराचे नागरिकांना फटका

0



आंवढी,वार्ताहर : आंवढी ता.जत येथे 

कोरोनाने एका मुत्यू झाल्याने व पुन्हा 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावात 100 टक्के लॉकडाऊन केले आहे.त्यात दुध संकलनही बंद करण्यात आले आहे.मात्र दुसरीकडे गावात बंदीनंतरही चोरटी दारू विक्री सुसाट सुरू असल्याची चर्चा आहे.






सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.उठाव नसल्याने शेतमाल, धान्यात नुकसान होत आहे. एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असलेला दुग्ध व्यवसायही प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीचा होत आहे. सध्या गावात कोरोना बाधित आढळून आल्याने दुध संकलन बंद केले आहे.गावात सध्या हाजारो लिटर दुधाचे करायचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Rate Card







दुसरीकडे गावात मतदान घेऊन केलेली दारूबंदीला हारताल फासला गेला आहे.गावात पुन्हा चोरटी दारू विक्री सुरू आहे.त्यावरचे म्हणजे तीन पानी पत्याचा क्लब,मटक्याचे अड्ड्यांना नेमके पोलीसाचे कारवाई न करता बळ देण्यामागचे गौडबंगाल काय हे वेगळे सांगायची गरज नाही,असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.