जतेत शुक्रवारी 8 नवे कोरोना पॉझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शुक्रवारी नवे आठ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
जत शहरातील एक डॉक्टर,एक पानपट्टी चालक,एक पोलीस कर्मचाऱ्यासह पाचजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.डोर्लीत एक तर रावळगुंडेवाडीत दोघेजण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

जत शहरातील संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे.
