जतेत वंचितचे डफली बजाव आंदोलन

0जत,प्रतिनिधी : राज्यातील संपूर्ण जिल्ह्याबाहेर एस.टी.ची व खाजगी वाहतूक सुरू करण्यात यावी,या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जत बसस्थानकात बुधवारी डफली बजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व अमोल साबळे यांनी केले.


कोरोना व्हायरस रोगामुळे लॉकडाऊनमूळे एस. टी. बस वाहतूक बंद करण्यात आल्या आहेत. फक्त एस. टी.ची जिल्हाअंतर्गत सेवा सुरू आहे.मात्र यामुळे एस. टी. महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कामगार यांचे पगार थकीत झाले आहेत. त्यामुळे पगाराअभावी उपाशी जगण्याची वेळ आली आहे.बससेवा सुरळीत झाली तर चालक व वाह्कांना त्यांचा कामाचा मोबदला वेळेवर मिळेल.त्यामुळे बससेवा सुरळीत होणे गरजेचे आहे.अनेकांना जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यास अनेक अडचणी येत आहेत.एस. टी. बस सेवा सुरळीत झाल्यास अनेकांना त्यांच्या गावी जाण्यास सोप होणार आहे. Rate Card


त्याचबरोबर खाजगी काळी-पिवळी जीप चालक व मालक यांचेहि मोठे नुकसान होत आहे. एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने  केली आहे. गणपती उत्सवासाठी खाजगी बस वाहतूकीचे बुकींग सुरुवात झाले आहे. खाजगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे ? सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत. परंतु त्या फारच अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे.त्याशिवाय सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.या मागणीसाठी हे डफली बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री. साबळे, श्रीकांत सोनवणे, संजय कांबळे ,प्रशांत झेंडे,सुरेश कोळी,सोन्या ढाले,त्रिमूर्ती उर्फ पिंटू कांबळे,विनय कोळी आदी सहभागी झाले होते.या आंदोलनास वडाप संघटना, रिक्षा संघटना, खाजगी वाहन संघटना व टेंपो वाहतूक संघटना यांनीही पाठिंबा दिला.


जत येथे बसस्थानकासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफली बजाव आंदोलन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.