उमदी पोलीसांना सँनीटाझर,फेस मास्कचे वाटप

0उमदी,वार्ताहर : उमदी पोलीस स्टेशन, उमदी येथे “तनिष्का फौंडेशन, महाराष्ट्र राज्य” यांचेवतीने एन-95 फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनीटायझर यांचे वाटप केले.सध्या कोरोना या संसर्गजन्य साथीमध्ये आपले पोलीस कोरोना विरुद्ध उभे ठाकले असून, अहोरात्र समाजहितासाठी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी झटत आहे. अशा परिस्थितीत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना या कोरोना आजाराची लागण होत आहे.Rate Card
या योध्दाच्या आरोग्याच्या काळजीपोटी एक खारीचा वाटा म्हणून “तनिष्का फौंडेशन महाराष्ट्र राज्य” या सामाजिक संस्थेमार्फत समाजहितासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.अध्यक्ष अनिल जाहीर (सर) यांनी पो.नि.दत्तात्रय कोळेकर यांच्याकडे हे साहित्य सुपुर्द केले.

यावेळी संगम महमदापुरी,रवी जाधव,दत्ता बिरुनगी,श्रीकांत पाटील,सोमशेखर नाठीकार,बसवराज साबनी,कुमार थोरात, सुनील कोळी,चंद्रकांत कोळी,सचिन कोळी,हर्षद कोळी, राजेंद्र ऐवळे,चिदानंद गेजगे,सुरेश ऐवळे,सतीश तोरणे,सिद्धू तोरणे,यल्लाप्पा तोरणे,पटू किटद, राजकुमार येरवेआप्पासाहेब जावीर आदी उपस्थित होते.उमदी पोलीसांना एन-95 फेस मास्क, फेस शिल्ड आणि सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.