राज्यभरात सार्वजनिक वाहतूक सुरू करा | वंचित आघाडीचे आज डफली बजाव आंदोलन

0जत,प्रतिनिधी : राज्यभर कोरोनामुळे बंद आलेली एस टी महामंडळ व सार्वजनिक वाहतूक सेवा पुर्वरत सुरू करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवार ता.12 रोजी डपली बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

राज्यभरात गेल्या चार महिन्यापासून एसटीसह खाजगी सार्वजनिक वाहतूक बंद आहे.यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.सांगली जिल्ह्यातही बंद असलेल्या काळी-पिवळी गाड्या बंद असल्याने त्यांची उपासमार होत आहे.त्यामुळे या वाहतूकीला परवानगी द्यावी,त्याशिवाय जत शहरात  कंटेनमेंट झोन परिसर कमी करून मुख्य बाजार पेठेसह प्रमुख चौकातील दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी वंचित आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.Rate Cardयावेळी तालुकाध्यक्ष अमोल साबळे,संजय कांबळे,प्रंशात झेंडे,रुतुराज कांबळे,योगेश राठोड,रोहित चव्हाण, शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.जत : राज्यभरात एसटीसह खाजगी सार्वजनिक वाहतूक सुरू करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.