गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्त दान करा ; जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत

0
4



     

सांगली :   कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे रक्त संकलनावर व रक्ताच्या मागणीवर परिणाम झालेला आहे. सद्या लॉकडाउन शिथिल झाल्यानतंर कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असले तरी  जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या हृदयरोग, कॅन्सर या सारख्या शस्त्रक्रिया होऊ लागल्या आहेत.







 त्याचबरोबर थॅलेसिमिया, हिमोफिलीया, अनिमिया रूग्णांना बरोबर गुतांगुतीची शस्त्रक्रिया, गरोदर माता प्रसुती शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रूग्ण यांंना रक्ताची गरज भासत आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे उद्भवत असलेल्या डेंगू, चिकणगुणीया या साथीच्या अजारामुळे रक्त व रक्तघटकांची मागणी वाढलेली आहे. जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here