बालगाव 14 दिवस लॉकडाऊन
बालगांव,वार्ताहर ; बालगाव(ता.जत)येथील एका तरुणाचा कोरणा चाचणी अहवाल पॉझिटिव आल्याने पूर्व भागात पुन्हा एकदा खळबळ उडली आहे.गेल्या आठ दिवसापूर्वी कर्नाटक राज्यातील कात्राळ येथील एका बाधित मृत्त व्यक्तीचा संपर्क आल्याने बालगाव तरूणाचा संपर्क आल्याने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बालगाव गावात आज पासून 14 दिवस लकडाऊन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती सरपंच संगीता बगली यांनी दिली.

त्याचबरोबर या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक आत्ता सेवा व्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये,नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास ही साखळी लवकर तोडण्यास मदत होईल.त्यासाठी नागरिकांनी घरातच बसून सहकार्य करावे,असे आवाहन उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी केले आहे.
