बेंळूखीचा परम माळी जोर,बैठक मारण्याच्या स्पर्धेत प्रथम
जत,प्रतिनिधी : आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय जोर व बैठक मारण्याच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेत बेळुंखी (ता.जत) येथील पै.परम लक्ष्मण माळी याने बैठक मारण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच पै.संतोष परशुराम माळी याने जोर मारण्याच्या स्पर्धेत द्वीतीय क्रमांक पटकावला.आत्मा मालिक कुस्ती केंद्र,कोकमठाण येथे सदगुरु आत्मा मालिक माऊलींच्या कृपाछत्र छायेखाली हे दोन्ही मल्ल नित्यनियमाने सराव करत आहेत. यांना आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक एनआयएस,राष्ट्रीय कुस्ती कोच पै.भरत नायकल यांचे मार्गदर्शन लाभले.
बेंळूखीतील मल्ल पै.परम माळी व पै.संतोष माळी
