बसस्थानके निर्मनुष्यच | बसेसना प्रवाशाची प्रतिक्षा कायम ; कोरोनाचा प्रभावचा सर्वाधिक फटका एसटीला
जत,प्रतिनिधी : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या एसटी महामंडळ आणखीन जादा फटका बसत आहे.महिन्याभरापासून सुरू असलेल्या बसेस प्रवाशाविना मोकळ्या धावत आहेत.तर बसस्थानक प्रवाशी फिरकत नसल्याने निर्मनुष्य झाले आहे.
लॉकडाऊनचे अँनलॉक झाल्यानंतर जिल्हा अतर्गंत बसेस सुरू करण्यात आला आहेत.शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही काही बसेस धावत आहेत.एकाच सीटवर एक प्रवाशी बसण्याचा नियम करूनही बसेसकडे प्रवाशी फिरकत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या महिन्या भरापासून सुरू झालेल्या बसेस अद्याप पर्यत प्रवाशाच्या प्रतिक्षेत आहेत.

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने एसटीचे गतवैभव परत कधी मिळणार असा प्रश्न व्यवस्थापनापुढे उभा ठाकला आहे.परिणामी कामगारांच्या वरही बेकार होण्याची वेळ आली आहे.जत तालुक्यात सुरू झालेल्या बसस्थानकात प्रवाशीची तुरळक गर्दी दिसत आहे.
जत बसस्थानकात प्रवाशी नसल्याने परिसर निर्मनुष्य झाला आहे.
