माडग्याळ | व्यवस्थित माहिती घेतल्यास कोरोनापासून बचाव शक्य ; मंजिरी घरत

0

 

माडग्याळ,वार्ताहर : कोरोना हा आजार श्वसन मार्गाचा आहे.ह्या आजाराला घाबरून न जाता आपण करेक्ट माहिती ठेवल्यास व्यवस्थित पाऊल उचलणे शक्य आहे.त्यामुळे आपण परिस्थिती होण्या अगोदर नागरिकांना वाचवू शकू,असे प्रतिपादन,कोरोनावरील गप्पा’ ह्या चर्चा सत्रात सौ.मंजिरी घरत बोलत होत्या.यावेळी महाराष्ट्र फार्मसी कॉन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, वेस्ट जोन अध्यक्ष सोमाभाऊ खरारे, सांगली जिल्हाध्यक्ष विशाल दुर्गाडे, अविनाश पोरे,निरंजन पाटील सहित सांगली जिल्ह्यातील सर्व फार्मसिस्ट चर्चासत्रात सामील झाले होते.

सौ.घरत म्हणाल्या, समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम फार्मासिस्ट करत असल्याने केमिस्टना कोरोना संबंधीत माहिती असणे गरजेचे आहें.समाजामध्ये फार्मासिस्टचे महत्व अगणित आहे.ह्या कोरोनाच्या महामारीत कुटुंबाचा विचार न करता रुग्णांची सेवा केमिस्ट मेडिकल दुकान चालू ठेवून अहोरात्र  रुग्णांची सेवा देत आहे.ह्या महामारीबद्धल केमिस्टना कोरोनाबद्धल पुरेपुर माहिती असावी ह्या हेतूने ‘कोरोनावरील गप्पा’ह्या चर्चासत्राचे आयोजन करून फार्मसिस्टना कोरोनासंदर्भात माहीती दिली जात आहे.

 Rate Card


त्या म्हणाल्या, मार्च-एप्रिल पेक्षाही जास्त आपण कोरोनाला ओळखलो आहोत. कोरोना हा सोशल डिस्टन्स न राखणे, मास्क न वापरणे, हात न धूणे,खोकताना अयोग्य पद्धतीने खोकणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विनाकारण घराबाहेर पडणे,संक्रमित व्यक्तीपासून संपर्क ठेवणे,त्यांच्या वस्तूशी स्पर्श करणे,अशाने कोरोना होत असतो.कोरोना होऊ नये म्हणून वरील गोष्ठी टाळल्या पाहिजेत.इंडियन कौन्सिलर मेडिकल रिसर्च नुसार अति सौम्य, सौम्य, मध्यम, तीव्र असे 4 प्रकार आहेत.जवळपास 80 टक्के पेशंट हे अति सौम्य लक्षणे असतात त्यात कोणतेही लक्षण दिसून येत नाहीत. कोरोनाचा विषाणू घशात ,नाकात असतो. ह्यामध्ये तो विषाणू फफ्फुसापर्यंत जात नाही.सौम्य लक्षण हे ही लक्षण विरहित असते त्यात सौम्य खोकला घसा खवखवणे होत असते. 

परंतु फफ्फुसापर्यंत हा विषाणू गेल्यास मध्यम व तीव्र कोरोनाची लक्षणे चालू होतात. मध्यम व तीव्रमध्ये 5 ते 7 दिवस खूप महत्वाचे असल्याने त्यांना अडमिट करून योग्य उपचार घेतल्याने पेशंट बरा होतो.अति सौम्य व सौम्य ह्या लक्षण प्रकारामध्ये कोरोना बाधित लोकांना कोणताही त्रास होत नसल्याने ते समाजामध्ये वावरत असतात त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्याने व्यक्ती कोरोनाबाधित होऊ शकते. त्यामुळे मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनीटायझर सतत वापर करणे, हात स्वछ धुणे, लोकांशी संपर्क टाळणे हे महत्वाचे आहे.ऑक्सीमीटरने ऑक्सिजन चेक करणे महत्वाचे आहे.ऑक्सिजन 95 च्या खाली येत असेल तर धोकादायक असू शकते.दमा लागणे,स्वास घेण्यास त्रास होणे, चव बदलणे, वास कमी येणे, पोट बिघडणे, सर्दी, तीव्र ताप, डोके दुखणे ,अशक्तपणा येणे, मसल दुखणे,हे होत असल्यास कोरोनाची लक्षणे असू शकतात. ब्लडप्रेशर वरील सर्व लक्षणे ही इतरही आजारात ही असू शकतात.कोरोनाचे लक्षणमध्ये धाप ही येते परंतु धाप असते तेव्हा हायब्लडप्रेशरमध्येही हे लक्षण असते परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोनाही लक्षण असू शकते.त्यामुळे कोणतेही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.

       

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.