डफळापूर सबस्टेशच्या इमारतीला गळती

0

डफळापूर,वार्ताहर : महावितरनच्या  डफळापूर सब स्टेशनची मुख्य ताराची जोडणी असलेल्या इमारतीला गेल्या आठवड्या भरातील पावसामुळे गळती लागली आहे.या उपकेंद्रातून डफळापूर सह परिसरातील बाज,बेंळूखी,कुडणूर,अंकलेसह अनेक गावांना येथून वीज पुरवठा करण्यात येत आहे.स्टेशनची मुख्य विद्युत जोडण्या असलेली इमारत जीर्ण झाली आहे.


इमारतीच्या छताचे सीमेंट ढासळू लागले आहे.इमारतीतील आतील भागही धोकादायक बनला आहे.गेल्या आठवड्यातील सततच्या पावसामुळे स्टेशनच्या जीर्ण इमारतीच्या छतातून पाण्याची गळती सुरू झाली आहे.

त्यातून पाणी थेट इमारतीत पडत असल्याने इमारतीत पाण्याचा डोह होत आहे.त्यामुळे मुख्य जोडण्या असलेल्या तारांना या पाण्यामुळे शॉर्ट होऊन इमारतीत स्फोट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. 


Rate Card


त्याशिवाय येथून सबस्टेशनच्या विज पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या ऑपरेटरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्याशिवाय इमारतीत स्फोट झाल्यास अनेक दिवस विज पुरवठा खंडित होण्याचीही भिती व्यक्त होत आहे.तातडीने या इमारतीच्या छताची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.डफळापूर महावितरणच्या इमारतीला गळती लागली आहे,तर छताचे सीमेंट असे ढासळू लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.