मोठ्या लग्न-सोहळ्यांअभावी बाजारपेठ थंडावली | कोरोनामुळे अर्थकारण बिघडले ; बेरोजगाराची संक्रांत अन् उपासमारीची वेळ

0उमदी,वार्ताहर : अर्थचक्र गतिमान करण्यात लग्न समारंभाचा सिंहाचा वाटा आहे.परंतु कोरोनाने जत तालुक्यातील अर्थचक्रच थंडावले आहे.साधारणत जानेवारी ते मे पर्यंत लग्नांचे मुहूर्त असतात.मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. विविध घटकांतील सुमारे पंचवीसपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतो.यंदा हा रोजगारच कोरोनाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे जगायचे कसे ? हा प्रश्न या घटकांना पडला आहे.त्यांची मोठ्या प्रमाणावर उपासमारी आणि हेळसांड होत आहे.लग्न म्हटले की मंगल कार्यालये,मंडप

डेकोरेटर्स, लायटिंग, साउंड सिस्टिम,

कॅटरिंग,स्वयंपाकी, विछायत केंद्र बँड पथक, पुरोहित, हारतुरेवाले,फेटेवाले, फोटोग्राफर, घोडेवाले, फटाके, न्हावी, ब्युटी पार्लर, स्पापासून गिफ्ट सेंटरपर्यंत, प्रिन्टिंग प्रेस, व्हिडिओग्राफर, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, कापड, शिंपी,सराफ आदी व्यावसायिकांना रोजगार मिळतो.लग्नाचा जानेवारी ते जून हा सहा महिन्यांचे सीझन असतो.मात्र यंदा या सिझनवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउन व संचारबंदीमुळे लग्नसमारंभ पूर्णपणे बंद आहेत.


कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे.अर्थचक्रच थांबले आहे. याचा फटका व्यावसायिकांना बसला असून त्यांचे वर्षभराचेआर्थिक नियोजन कोलमडले आहे.दरवर्षी मार्च महिन्यांपासून लग्नसराईला धुमधडाक्यात प्रारंभ होतो. प्रशासनाने मार्च महिन्यापासूनच लग्न-सोहळ्यावर बंदी आणली आहे.लॉकडाउन मुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. सर्वांचेच आर्थिक नियोजनही कोलमडले आहे.संपूर्ण लग्नसराईचा सीझनच हातचा गेला आहे.आत्ता डिसेंबर महिन्यापर्यंत लग्न तिथी नाहीत.त्यामुळे या व्यवसायात गुंतवणूक केलेल्या सर्व व्यापारी, किरकोळ दुकानदारांचे कंबरडेच मोडले आहे.वर्षभराचा आर्थिक ताळेबंद कसा बसवायचा ?.असा प्रश्नच मंडप व्यावसायिकांसह इतर सर्वच संबंधित व्यावसायिकांना पडला आहे.


मार्चपासून सुरू झालेली ही धूम जूनपर्यंत कायम असते.तालुक्यात सर्वच ठिकाणीची मंगल कार्यालय गर्दीने गजबजून गेलेली असतात.मंगल कार्यालयासमोर वाहनांच्या लागलेल्या रांगा मात्र यंदा दृष्टीस पडल्या नाहीत.लग्नसराईच्या चार महिन्यात होणाऱ्या उत्पन्नावर वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते, जीएसटी, इलेक्ट्रिक बिल, मेंटनन्स आदी सर्व याच  सिझनच्या भरवशावर अंवलबून असतो. यंदा मात्र उत्पत्रच बुडाल्यामुळे आमच्या समोर समस्यांचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे.आधीच डीजेमुळे डबघाईस आलेल्या बँजो व्यवसायाची कोरोनाने यावर्षी वाट लागली आहे.बँजो पार्टीवाले रोजनदारीच्या कामावर जात आहेत.

 

” गेल्या अनेक वर्षांपासून बँजो वाजवण्याचा आमचा व्यवसाय आहे.आमचा उदरनिर्वाह चालतो.कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.शासनाने मानधन सुरु करून दिलासा द्यावा.”

Rate Card

रमेश भगवान हेगडे.


स्वरसंगम म्युझिकल बेंजो पार्टी.

जालिहाळ खुर्द.“लग्नसोहळे कोरोना मुळे रद्द झाल्याने फोटोग्राफरचा व्यवसाय धोक्यात आला आहे. धंद्यात मोठी गुंतवणूक केली आहे.”


भैरु कांबळे

फोटोग्राफर,दरीबडचीLeave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.