ग्रामपंचायतीवर अखेर प्रशासकाच्या नेमणूका
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून स्थानिक प्राधिकरणातील सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना नेमावेत या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर ग्रामपंचायतीवर गुरूवारी प्रशासक म्हणून पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या.जत तालुक्यात पाचच विस्तार अधिकारी असल्याने एकाकडे सात ते आठ ग्रामपंचायतीचा पदभार देण्यात आले आहेत.सरकारने ग्रामपंचायतीवर खाजगी व्यक्ती नेमण्याचे आदेश काढले होते.अखेर न्यायालयाने तो आदेश रद्द करत प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते.जतमधील ग्रामपंचायतीचे प्रशासक असे,एस.एस.सौदागर ; अंकलगी,निगडी बु.,सनमडी,शेड्याळ,उटगी,वळसंग,
एम.आर.जाधव ; जाळीहाळ खु,मेंढिगिरी,मोरबगी,सिध्दनाथ
पी.एस.चव्हाण ; येळदरी,अंकले, धावडवाडी,डोर्ली,गुगवाड,कुडणूर,
टी.व्ही.संकपाळ ; घोलेश्वर,गुड्डापूर,लमाणतांडा(

पी.पी.खराबे ; भिवर्गी,करेवाडी(ति),लमाणतांडा(
