माडग्याळमध्ये युरियाचा तुटवडा

0




माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ व परिसरातील ऐन हंगामात युरियाचा तुटवडा होत असल्याने खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी दुकानासमोर तूफान गर्दी होत आहे.युरियाचा साठा वाढवून देण्याची मागणी होत आहे.






शेतकऱ्यांना युरिया देताना एक शेतकऱ्याकडून त्याच्या आधारकार्ड लिंक करून एकच पोते दिले जात आहे.मात्र अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बागायत क्षेत्र वाढल्याने युरियाची मागणी वाढत आहे. 

मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे .

यंदा पिकांची लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.

Rate Card

परिणामी गेल्या महिन्याभरातील रिमझिम पावसाने पिंके दमदार आली आहेत.त्यांना सध्या युरिया खताची गरज आहे. 




मात्र माडग्याळ परिसरातील कृषी दुकानातून मागणी नुसार युरिया मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. युरियाची उपलब्धता होताच कृषी दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत असून सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडत आहे.  



माडग्याळ मध्ये युरियाच्या खरेदीसाठी अशी गर्दी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.