जत,प्रतिनिधी : सिंगनहळ्ळी ता.जत येथे जमीन नावावर करण्याच्या कारणावरून पाच जणांना तलवार,काठ्या,दगडाने
हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी घडली.याबाबत शंकर मरीबा हिप्परकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,शंकर हिप्परगी व अनिल हिप्परकर यांच्या कुंटुबात जमीनच्या कारणावरून वाद आहे.त्यावरून बुधवारी शंकर हिप्परकर यांच्या घरासमोर सकाळी साडेनऊच्या दरम्यान संशयित अनिल हिप्परकर,संजय हिप्परकर,मल्हारी हिप्परकर,खंडू हिप्परकर,दत्ता हिप्परकर,बापू हिप्परकर,सुंदराबाई हिप्परकर,सुनीता हिप्परकर,अरूणा हिप्परकर यांनी जमीन नावावर कर म्हणत तलवार,काठी दगडाने फिर्यादी शंकर,चुलते नाथा हिप्परकर,वडील मरीबा हिप्परकर,बहिण कांताबाई हिप्परकर,भाऊजी कृष्णदेव हिप्परकर यांना गंभीर मारहाण करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.अद्याप कोणासही अटक केलेली नाही.





