गुड्डापूरमध्ये बंद घर फोडले | जत तालुक्यात चोऱ्याचे सत्र सुरू ; पावनेदोन लाखाचा ऐवज लंपास

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पुन्हा चोऱ्याचे सत्र सुरू झाले आहे.बुधवारी येळदरी येथील भरदिवसाच्या पाठोपाठ गुड्डापूर येथे बुधवारी मध्यरात्री नव्याने बांधलेल्या घराचा दरवाज्या तोडून चोरट्यांनी तब्बल पावनेदोन लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी,मुळ आंसगी जत येथील संभाजी शिवाजी माने सध्या गुड्डापूर येथे भाड्याच्या घरात राहत होते.त्यांनी गुड्डापूर येथेच जागा घेऊन नवे घर बांधले आहे.त्यांनी गुरूवारी घराची पुजा होती.तत्पुर्वी भाड्याच्या घरातील सर्व साहित्य,सोने नाणे नव्या घरात नेहले होते.पुजा नसल्याने माने कुंटुबिय भाड्याच्या घरात झोपले होते.गुरूवारी पुजा असल्याने ते नवीन घराकडे गेल्यानंतर घराचे कुलूप दिसले नाही.संभाजी माने यांनी घरात जाऊन बघितले असता सर्व साहित्य विस्कटून टाकलेले आहे.त्याचबरोबर कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले मनीमंगळसुत्र,सोन्याची दोन चैन,अंगटी,कानातील टॉप,रिंग,पैंजन असे पाच तोळ्याचे दागिणे,पंधरा हाजार रोख असा सुमारे एक लाख 67 हजाराचा ऐवज लंपास केला.अधिक तपास विनायक शिंदे करत आहेत.

Rate Cardदरम्यान लॉकडाऊन व पो.नि.रामदास शेळके यांच्या दक्षतेने जत तालुक्यात चोऱ्यांसह गुंडगिरी,दहशतीचे प्रकार पुर्ण बंद झाले होते.मात्र त्यांच्या बदलीनंतर चोरटे,गुन्हेगाऱ्यांनी तोंड वर काढले असून घरफोडीच्या घटनेसह जत शहरात पुन्हा गुन्हेगारीचे प्रकार सुरू झाले आहेत. भर दिवसा शहरात गुंडागर्दी,दमबाजी करणे,सावकारीचे उंदड पिक पोलीस दलाला आवाहन देत आहे.अधिकाऱ्यांनी पुन्हा आपली ताकत दाखविणे महत्वपूर्ण ठरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.