जतमध्ये बाधित रुग्ण सापडलेल्या परिसरात कंटेनमेंट झोन

0सांगली :  जत शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या नदाफ गल्ली परिसर, मंगळवार पेठ परिसर, वळसंग रोड कोठावळे प्लॉट, आंबेडकर नगर परिसर, अंकलगी येथे माळी वस्ती येथील परिसर, सोन्याळ येथे बिराजदार वस्ती येथील परिसर, निगडी खुर्द येथे दत्त मंदीर येथील परिसर, उमराणी येथे अभंगे वस्ती येथील परिसर, लोहगाव येथे मुलाण खोरे डोंगर पायथा, सालेकीरी (पाच्छापूर) येथे खांडेकर वस्ती येथील परिसर, सनमडी येथे महात्मा फुले प्राथमिक आश्रमशाळा  येथील परिसर, बाज येथे मिसाळ वस्ती परिसर, शेगाव येथे साई नगर परिसर, बिळूर येथे बंजत्री गल्ली परिसर, लमाणतांडा (उटगी) येथे चनगोंड वस्ती परिसर या हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहेत तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे.


Rate Card


तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली.

सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.