येळदरीत घर फोडले | 18 तोळे सोन्यासह सव्वा सात लाखाचा मुद्देमाल लंपास
जत,प्रतिनिधी : येळदरी ता.जत येथील रत्नाबाई दादासाहेब भिसे यांचे राहते घर फोडून चोरट्यांनी 18 तोळे सोन्यासह सव्वा सात लाखाचा मुद्देमाल लंपास केला.दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,रत्नाबाई भिसे या मुंबई येथील विक्रोळी भागात राहत होत्या.मार्चपासून कोरोना लॉकडाऊन मुळे त्या त्यांची मुलगी रुपाली जावाई सुशांत व नातवंडासह येळदरी येथे राहण्यास आल्या आहेत.मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घराला कुलूप लावून रत्नाबाईसह त्यांच्या घरातील सर्वजण शेतात कामासाठी गेल्या होत्या.त्यादरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून सर्व साहित्य विस्कटून टाकत, बेडमध्ये असलेल्या बँकेतील सोने,रोख रक्कम असलेली बँक पळविली.रत्नाबाई व त्यांची मुलगी रुपाली घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.त्यांनी जत पोलीसात धाव घेत फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी सोन्यांचादीचे सुमारे 18 तोळे चार ग्रँमचे सोन्याचे दागिणे,रोख 59 हजार असा सुमारे सव्वासात लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने भितीचे वातावरण पसरले आहे.
अधिक तपास प्रशिणार्थी डिवायएस डॉ.निलेशपालवे करत आहेत.