जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून पुन्हा नागरिकांची लुट करण्यात येत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत जुलै ते नोव्हेबर या कालावधीत राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची पुन्हा स्वस्तधान्य उपलब्ध केले आहे.त्यात या दुकानदाराकडून हेळसाड करण्याचे प्रकार अनेक गावात होत आहेत.
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून गहू,मोफत तांदुळाचे सुरळीत वाटप करण्यात येत आहे,कोरोना काळात हे धान्य नागरिकांचा आधार बनले आहे.कोरोना लॉकडाऊनच्या पहिल्या तीन महिन्यात सतर्क झालेल्या महसूलच्या अधिकाऱ्यामुळे या धान्याचे वितरण सुरळीत झाले खरे मात्र ते औटघटकेचे ठरले आहे.पुन्हा या दुकानदारांनी कार्डधारकांना नाडविण्याचे प्रकार सुरू केले आहेत.तालुक्यातील अपवाद वगळता अनेक दुकानदार वेळेत दुकाने उघडत नाहीत.मोफत धान्य आले नसल्याचे सांगत हडपण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.त्याशिवाय धान्याचे दर वाढवून लुट केले जात असल्याचे आरोप होत आहेत.
जत पश्चिम भागातील दुकानात भानगडी
जत पश्चिम भागातील अनेक गावातील दुकानात अनेक रेशनकार्ड धारकांचे धान्य आले नसल्याचे सांगून त्यांना धान्य दिले जात नाही.त्याशिवाय मोफत गहूं,तांदुळ हडपणे,जादा पैसे लुटण्याचे प्रकार सुरू आहेत.असे हडपलेले धान्य काळ्या बाजाराने विकले जात असल्याचे आरोप होत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.