आरोग्य,सामाजिक आरोग्य जपणारा ध्येयवेडा : डॉ.रविंद्र एल.हत्तळी
स्वतः साठी सगळेच जगतात, मात्र इतरांसाठी जगण्याचा आनंद काही वेगळाच असतो.अशाच वैद्यकीय सेवेतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉ.रविंद्र एल.हत्तळी यांच्या सरस्वती क्लिनिक यांच्या दवाखान्याला 23 वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्यानिमित्त डॉ.हत्तळी यांच्या वैद्यकीय,सामाजिक कार्याचा वेध घेणारा लेख…
दवाखाना म्हटलं की सर्वसामान्य माणसाला आर्थिक कसरत करावी लागते. वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची अनेकवेळा लूट झाल्याचे निदर्शनास येते शिवाय मानसिक त्रास वेगळाच अनुभवास येतो. हृदयशून्य व्यावसायिक स्पर्धेत काही संवेदनशील व्यक्तीचं सुद्धा दर्शन घडतं.असाच जत
सीमावर्ती,ग्रामीण भाग असलेल्या उमदू येथील सामाजिक आरोग्य जपणारा देवमाणूस डॉ.रविंद्र एल,हत्तळी यांचं अतुलनीय कार्य प्रेरणादायी आहे.(बीएच एमएस,डी फार्म,सी सी एच,सी सी एम पी)शिक्षण घेतलेले डॉ.हत्तळी यांचा उमदी परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात हातकंडा आहे.
डॉ.हत्तळी उमदी येथील प्रसिद्ध जनरल
स्पेशालिस्ट तज्ञ आहे.उंच सडपातळ देहयष्टी असलेल्या डॉ.हत्तळी यांच्या चेहऱ्यावरील मंद स्मित रुग्णांचा ताण हलका करते.त्यांच्या क्लिनिक मध्ये प्रवेश करताच हळू आवाजातील सुमधुर संगीत ऐकुन मन प्रसन्न होतं.वैद्यकीय व्यवसाय सांभाळताना सामाजिक बांधिलकी जपणारी मंडळी अभावानेच आढळतात. मात्र डॉ.हत्तळी यांनी शरीर आणि मन या दोन्ही पातळ्यांवर रुग्णांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केलाय. रुग्णांप्रती त्यांची वागणूक ही अतिशय सौजण्यपूर्वक , नम्र असते.तपासणी करताना ते मानसशास्त्रीय कौशल्याचा उपयोग करीत रुग्णांच्या अंत:र्मनाचा ठाव घेतात.
व्यसना विषयी आवर्जून चौकशी करतात. त्यांना बोलकं करतात.शिस्तबद्ध तपासणी करून योग्य कौटुंबिक सल्ला देतात.त्यांच्या उपचाराने वेदना तर संपतातच उलट ते मनोबल वाढवितात. रुग्णांना मोकळा ‘ श्वास ‘ घेण्याकरिता आत्मविश्वास निर्माण करतात. शिस्तबद्ध आयुष्य जगण्याचा ‘ कानमंत्र ‘ देतात. गरजू गरीब रुग्णांचा ‘ आवाज ‘ बनतात. त्यांची कृती जीवनातील निखळ आनंद टिकवून ठेवण्याची, जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी जागविते. उपचार करताना डॉ.हत्तळी माणसं वाचतात. त्यांच्यातील सर्जनशीलता रुग्णांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करतात.डॉ.हत्तळी हे कृतिशील व्यक्तिमत्व. भल्या पहाटे योगा, व्यायामाने त्यांच्या दिनचर्येस प्रारंभ होतो.46 व्या वर्षीय तरूणतुर्क डॉक्टरची आजच्या युवापिढीला लाजवेल अशी जीवनशैली. वेळेचे महत्त्व इतरांना सांगताना स्वतः त्याची आधी अंमलबजावणी करतात.
चार दशकं त्यांनी गरजू रुग्णांची अविरत सेवा केली.आजही तेवढ्याच उत्साहाने गरजू रुग्णांपर्यंत पोहचतात. डॉ.हत्तळी यांचा बालपण ते शैक्षणिक प्रवास सोलापूर, मुंबई पुणे असा झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सन 2 ऑगष्ट 1998 मध्ये उमदी खाजगी दवाखाना सुरू करून त्यांनी एकप्रकारे मोठ्ठं आव्हान स्वीकारलं. ग्रामीण दुर्गम भाग असल्याने फारशी उपचाराची सोय नव्हती.अर्थात त्यांच्यातील सेवाभावी वृत्तीने मात केली. गरीब रुग्णांना मोफत सेवा देता यावी म्हणून त्यांनी उमदीची निवड केली आहे. माणसांत देव शोधणाऱ्या डॉ.हत्तळी यांची समाजभान जपणारी ‘आरोग्य वारी’ अविरत सुरू आहे.
गरीब,गरजूंना नाममात्र दरात रुग्णसेवा करतात.त्यांचं दोन तीन महिन्यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं. आणि ते त्यांच्या दवाखान्यात दर्शनी भागात पाहायला मिळते. रुग्णाची आजार विषयक हिस्ट्री नोंदविली आहे. संबधित रुग्ण आल्यास अवघ्या काही मिनिटांत त्याचं रेकॉर्ड शोधून उपचाराची दिशा ठरवितात.गत दोन दशकांपासून उमदी सह ग्रामीण, दुर्गम भागात जवळपास लाखांहून अधिक गरजू रुग्णांवर योग्य उपचार करत त्यांना बंर केलं आहे.
साधी राहणी, उच्च विचारसरणी ही नीतिमूल्ये त्यांच्या आयुष्याला वैचारिक आकार देऊन गेली.
खादी,स्वदेशी वस्तूंचा प्रसार करणाऱ्या डॉ.हत्तळी यांच्या मध्ये अनेक जण ‘ म.गांधी ‘ शोधतात.रुग्णसेवेसाठी लायन्स क्लब उमदीची स्थापना करून त्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा नियमित देत असून चैतन्यमूर्ती डॉ.हत्तळी यांचा सेवेचा यज्ञ अविरत सुरू आहे.डॉक्टर रविंद्र हत्तळी यांना तीतकीच साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ.भारती हत्तळी यांचे योगदान महत्वपूर्ण ठरत आहे.त्यांचा मुलगा देखील त्याच तळमळीने खंबीरपणे साथ देवून गौरवशाली वारसा पुढे चालविण्यासाठी प्रयत्न करील ही बाब नक्कीच अभिमानाची आहे.
डॉ.रविंद्र हत्तळी यांचा सामाजिक संस्थातील सहभाग
• संस्थापक/उपाध्यक्ष ; लायन्स क्लब, उमदी
• सेक्रेटरी ; लायन्स चँरिटेबल ट्रस्ट,उमदी
• माजी अध्यक्ष ; लायन्स क्लब,उमदी
• सेक्रेटरी ; रितुराज चँरिटेबल ट्रस्ट, उमदी
• सेक्रेटरी ; उमदी मेडिकल असोसिएशन, उमदी
• जी.पी.फार्म ; संघटना,सांगली
• सदस्य ; HIMPA मेडिकल,असोसिएशन, सांगली
• खनिजदार ; तेली समाज संघटना,उमदी
• संस्थापक ; भारती नर्सिंग होम व सरस्वती क्लिनिक,उमदी
शंब्दाकन ; दत्तात्रय बिरूनगी,उमदी